ताज्या बातम्या

मुंबईत उभारले जाणार अत्याधुनिक ‘सातारा भवन’; शिवेंद्रराजे भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे भूखंडाची मागणी

सातारा : मुंबई आणि नवी मुंबई परिसरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विविध कारणांनी वास्तव्यास असलेल्या सातारकरांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘सातारा भवन’ उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पासाठी मुंबई किंवा नवी मुंबई परिसरात योग्य भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
समर्थ सातारा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या स्मरणार्थ हे ‘सातारा भवन’ साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भवनामध्ये शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारकर युवक-युवतींसाठी मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज निवासव्यवस्था, प्रशिक्षण सुविधा तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सभागृहे व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईतील सातारकर समाजाला एकत्र येण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ मिळेल. समाजातील ऐक्य अधिक दृढ होण्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
समर्थ सातारा प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षांपासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या प्रयत्नांचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कौतुक केले आहे. राज्य सरकारकडून भूखंड उपलब्ध झाल्यानंतर ‘सातारा भवन’च्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल आणि मुंबईतील सातारकरांचे बहुप्रतीक्षित स्वप्न लवकरच प्रत्यक्षा

Scroll to Top