ताज्या बातम्या

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळांना उद्या ७ जुलै सुट्टी

ठाणे : अतिवृष्टीचा इशारा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या, मंगळवार (७ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केडीएमसी शिक्षण विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून शाळांनी पालकांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानेही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Scroll to Top