सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा शहरामध्ये नागरी सुविधांबाबत लोकांना आंदोलन करावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासकीय कारभार आणि आता लोकशाही मार्गाने कारभार सुरू आहे. याची संपूर्ण चौकशी करावी. या मागणीसाठी रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांच्यासह करदाते सातारकर उपोषणाला बसलेले आहेत. सातारा नगर २०२३-२०२४ व २०२४-२५ च्या सातारा नगर परिषदेच्या खर्चाची माहिती जाणीवपूर्वक लपवली जात आहे. अनेक ठेकेदारांची उकळ पांढरे केले असून नियमबाह्य अतिक्रमण झालेले आहे. मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असून सध्या त्याचे नूतनीकरण झाले आहे. अशी परिस्थिती आहे. सातारकर नागरिकांना या सर्व खर्चाचा वस्तुनिष्ठ तपशील जाहीर करण्यासाठी निकल सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश उबाळे, पूजा बनसोडे, अक्षय कांबळे, विशाल वायदंडे, नितीन रोकडे, आनंदा कांबळे यांच्यासह सातारकर नागरिक यांनी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे . आंदोलक पावसाळ्यात आणि भ्रष्टाचारी तसेच त्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारी अधिकारी आलिशान कार्यालयात अशी परिस्थिती आहे.
महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकाराची गळचेपी चालू केली होती. परंतु मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्त्यांनी उठाव केल्यानंतर माहितीच्या अधिकाराच्या नव्या मसुदाला स्थगिती दिली होती. आता सातारा नगरपरिषदेने लेखाजोखा सादर करण्यास कायदेशीर अडचण निर्माण झालेली नाही. पळवाटा बंद झाली आहे. सातारा नगर परिषदेचा वस्तुनिष्ठ खर्चाचा हिशोब लेखी दिल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही. असा इशाराही दिला आहे.
सातारा शहरातील राजवाडा ते बॉंबे रेस्टॉर्रट तसेच राजवाडा, वाढेफाटा, पोवईनाका ते अजनठा चौक, पोवईनाका ते मोळाचा ओढा परिसरात अनाधिकृत बांधकाम व टपरी उभे आहेत. त्याबाबत किती कारवाई झाल्या? काही टपऱ्यांवरती महिने महिने कारवाई होत नाही. त्यांना कुणाचा वरदहस्त आहे. टपऱ्या काढू नका किंवा टपऱ्या हटवा अशी कुणी लेखी निवेदन दिले आहे का? बाबत कारवाई काय झाली? याची माहिती लपवली जात आहे. याचप्रमाणे घनकचरा प्रकल्पासाठी मागील दोन आर्थिक वर्षात वार्षिक खर्च प्रकल्पामधून मिळालेले उत्पन्न तसेच विक्री केलेल्या खताची लेखी माहिती मिळावी. सातारा नगरपरिषद मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या? त्यांच्या मिळत असलेल्या वेतन? याची माहिती मिळावी. यांचप्रमाणे वेगवेगळ्या व्यवस्थापनेसाठी कित्ती कंत्राटी कामगार आहेत? त्याचा ठेका व उप ठेकेदार कोण आहे? सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केली आहे? कचरा गोळा करण्यासाठी नगर पालिकेच्या घंटा गाड्याची संख्या?, भाड्याने घेतलेल्या घंटा गाड्याची संख्या,? चालकाची संख्या?, त्यांना मिळत असलेले वेतन याची सविस्तर माहिती मिळावी, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वार्षिक खर्च नगर पालिकेला सर्व विभागातून मिळालेल्या उत्पन्न त्याचप्रमाणे शहरात झालेले नवीन काँक्रिट रस्ते, गटर, पथदिवे आदीची देखभाल दुरुस्ती टेंडर, ठेकेदार बिलासह माहिती मिळावी अशी मागणी श्री रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याची तातडीने दखल घ्यावी यासाठी आता रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे. दरम्यान, याबाबत शेकडो माहितीच्या अधिकाराचा अर्ज करण्यापूर्वी माहिती द्यावी. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सूचना केली आहे. या अधिकाराबाबत होणारा अर्जाचा खर्च संबंधित सातारा नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्याकडून वसूल करण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयात धाव घ्यावी लागेल. असा इशारा दिला आहे. ———————————– फोटो- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा नगर परिषदेच्या चौकशीसाठी बसलेले उपोषण करते (छाया- अजित जगताप, सातारा)




