ताज्या बातम्या
“कटकारस्थानातून पराभव, राजीनामा नाही” — ममता बॅनर्जींचा संतप्त आरोप; निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर गंभीर निशाणामुंबईत जन्म-मृत्यू नोंदींमध्ये मोठा घोटाळा? ८७ हजार नोंदी संशयाच्या भोवऱ्यात; दोषींवर कारवाईची मागणीसेनापती बापट मार्गावरील मीनाताई फूल मार्केट परिसरात तरुणांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनकस्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी७५ दिव्यांनी ओवाळणी औक्षण आणि केक यांचा संगम ! स्वर हार्मनीच्या गीतांच्या नजराण्याने सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचा अमृतमहोत्सव साजरा

सेनापती बापट मार्गावरील मीनाताई फूल मार्केट परिसरात तरुणांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : मुंबईतील सेनापती बापट मार्गावरील मीनाताई फूल मार्केट परिसरात काल पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांवर काही हमालांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत योगेश मिलिंद गढीरे आणि पुथवी बाळकृष्ण सिरकुंडा (दोघेही रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सेनापती बापट मार्ग) हे घरी जात असताना अज्ञात कारणावरून त्यांच्यावर बांबू, लोखंडी रॉड आणि कॅरेटसारख्या वस्तूंनी बेदम मारहाण करण्यात आली.
हल्ल्यात योगेश गढीरे हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला तातडीने k.E M.रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुथवी सिरकुंडा यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दादर पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top