ताज्या बातम्या
“कटकारस्थानातून पराभव, राजीनामा नाही” — ममता बॅनर्जींचा संतप्त आरोप; निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर गंभीर निशाणामुंबईत जन्म-मृत्यू नोंदींमध्ये मोठा घोटाळा? ८७ हजार नोंदी संशयाच्या भोवऱ्यात; दोषींवर कारवाईची मागणीसेनापती बापट मार्गावरील मीनाताई फूल मार्केट परिसरात तरुणांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनकस्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी७५ दिव्यांनी ओवाळणी औक्षण आणि केक यांचा संगम ! स्वर हार्मनीच्या गीतांच्या नजराण्याने सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचा अमृतमहोत्सव साजरा

स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

मुंबई – पुणे मिसिंग लिंक मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी संतोष पटकारे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे
महोदय,
सविनय विनंती की, मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा – खंडाळा घाट परिसरातील “मिसिंग लिंक मार्ग” हा महाराष्ट्राच्या विकासातील ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार असल्याचे सोशल मीडियातून समजले. सदर मार्गाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे.
लोकपरंपरा, जनश्रुती आणि सामाजिक स्मरणात जपल्या गेलेल्या कथेनुसार, सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्ग दाखवून ब्रिटिशांना मदत करणारे आणि त्याबदल्यात स्वातंत्र्याची मागणी करून हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या ऐतिहासिक मार्गाला / प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाजघटकांचे योगदान आहे. अशा दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने हा मार्ग / प्रकल्प ओळखला गेला, तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल. विशेषतः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास ती संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.
तरी आपण सकारात्मक विचार करून १ मे २०२६ पूर्वी “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करावे, ही नम्र विनंती.आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करतो आपणं हा निर्णय घेतल्यास समस्त धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल

Scroll to Top