ताज्या बातम्या
ओम साई मित्र मंडळ,साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वाशी नाका चेंबूर येथे विविध कार्यक्रमचे आयोजनभाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचा कराडमध्ये रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन ! उदय भानू चिब यांच्या अटकेचा व हनमंत पवारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेधचतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार ; ३ मार्च रोजी पुण्यात शानदार सोहळ्यात होणार प्रदानदेशातील अनागोंदी विद्यापीठांचा पर्दाफाश; तीन विद्यापीठावर बंदीची नामुष्की ३० विद्यापीठे यु.जी.सी.च्या रडारवर, काॅपी पेस्ट पी.एच.डी. पदव्यांचा झोलधारावीमध्ये दहावी, बारावी व पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवसरात्र अभ्यासिकेची विशेष सोय…..

ओम साई मित्र मंडळ,साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वाशी नाका चेंबूर येथे विविध कार्यक्रमचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर ) :ओम साई मित्र मंडळ, साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वाशी नाका चेंबूर मुंबई-४०० ०७४ येथे श्री साईनाथ मंदिर २४ वा वर्धापन वर्धापन दिनानिमित्तविविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी सर्व साई भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिषेक आणि नवग्रह पूजा व श्री साईबाबा पालखी सोहळा तर दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हळदी कुंकू समारंभ व सायंकाळी ७ वा.ते रात्री १० वाजेपर्यंत साई गीतांचा अविष्कारहोणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दादुस चौधरी ( सुप्रसिद्ध गायक व बिग बॉस फेम मराठी सीजन-३) उपस्थित रहाणार आहेत.दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्यनारायण महापूजा व श्री साई बाबा महाआरती व महाप्रसाद( साईभंडारा) होणार आहे. तर दिनांक १ मार्च २०२६ रोजी पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर व आरसीएफ व ओम साई मित्र मंडळ यांच्या नियोजनाने मेडिकल कॅम्प चे आयोजन केले आहे. तसेच ओम साई मित्र मंडळाचे सचिव राम ज्ञानू पाटील यांच्या यांच्या मातोश्री स्वर्गीय सोनाबाई ज्ञानू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री साई मंदिरास स्टीलची पालखी देणगी स्वरूपात देण्यात आली आहे त्याबद्दल सर्व साई भक्तांकडून पाटील परिवाराचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
ओम साई मित्र मंडळ अध्यक्ष किशोर महादेव आंग्रे,उपाध्यक्ष हनुमंता हुलप्पा पुजारी, सचिव राम ज्ञानू पाटील,सचिव बबन तुकाराम फागे , खजिनदार मनोहर गणपत साटम व सर्व मंडळाचे सभासद यांच्यावतीने सर्व साई भक्तांना व नगरवासीयांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top