ताज्या बातम्या
पाचवड फाटा येथे बेशिस्त पार्किंगचा विळखा; रस्त्यावरच उद्योगधंदे, गटारात कचऱ्याचे साम्राज्य! प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांना त्रासअंधेरीत ‘ऑल ॲबिलिटी नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६’चे आयोजन; दिव्यांग खेळाडूंना मिळाले राष्ट्रीय व्यासपीठ महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान आणि जम्मू-काश्मीरचे संघ सहभागीफलटणमध्ये मतदानासाठी रामराजेंनी रणजीत दादांना मागितली परवानगी…..स्तन कॅन्सरवर मार्गदर्शन आणि जनजागृती करणारी ही पहिलीच कादंबरी! — डॉ. मधुकर वर्तक…… डॉ. सुनिता चव्हाण यांच्या ‘शीरो’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्नडॉ. गोरखनाथ पोळ यांना ‘शिक्षण, साहित्य व समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान! केतकी प्रकाशनच्या दिवाळी अंक २०२६ चे मुंबईत प्रकाशन; २१ मान्यवरांचा केतकी पुरस्काराने गौरव

पाचवड फाटा येथे बेशिस्त पार्किंगचा विळखा; रस्त्यावरच उद्योगधंदे, गटारात कचऱ्याचे साम्राज्य! प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांना त्रास

कराड(प्रताप भणगे)

: कराड तालुक्यातील पाचवड फाटा परिसरात बेशिस्त पार्किंग, रस्त्यावरच थाटलेले उद्योगधंदे आणि गटारांमध्ये साचलेला मोठ्या प्रमाणातील कचरा यामुळे परिसरातील स्वच्छता आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पाचवड फाटा परिसरात वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच काही व्यावसायिकांकडून रस्त्यावरच व्यवसाय थाटण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे, परिसरातील उघड्या गटारांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, पिशव्या आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसून येत आहे. यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येण्याचाही धोका आहे.

विशेष म्हणजे, पाचवड फाटा हा महत्त्वाचा वाहतुकीचा परिसर असताना येथील बेशिस्त पार्किंग आणि अस्वच्छतेकडे संबंधित यंत्रणेचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे!

– रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी.
– रस्त्यावर झालेले अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसाय हटवावेत.
– गटारांची तातडीने स्वच्छता करावी.
– नियमित कचरा संकलन आणि स्वच्छता मोहीम राबवावी.
– वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.

पाचवड फाटा परिसर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाला जाग कधी येणार? नागरिकांच्या समस्यांवर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top