ताज्या बातम्या
ओम साई मित्र मंडळ,साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वाशी नाका चेंबूर येथे विविध कार्यक्रमचे आयोजनभाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचा कराडमध्ये रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन ! उदय भानू चिब यांच्या अटकेचा व हनमंत पवारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेधचतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार ; ३ मार्च रोजी पुण्यात शानदार सोहळ्यात होणार प्रदानदेशातील अनागोंदी विद्यापीठांचा पर्दाफाश; तीन विद्यापीठावर बंदीची नामुष्की ३० विद्यापीठे यु.जी.सी.च्या रडारवर, काॅपी पेस्ट पी.एच.डी. पदव्यांचा झोलधारावीमध्ये दहावी, बारावी व पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवसरात्र अभ्यासिकेची विशेष सोय…..

भाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचा कराडमध्ये रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन ! उदय भानू चिब यांच्या अटकेचा व हनमंत पवारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध

कराड : भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना झालेली बेकायदेशीर अटक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनमंत पवार यांना पुणे येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने कराड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

सातारा जिल्हा युवक काँग्रेस, कराड तालुका काँग्रेस कमिटी आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या दडपशाही व लोकशाहीविरोधी धोरणांचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष वैशाली जाधव, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय सुर्वे यांच्यासह दिग्विजय सुर्यवंशी, नरेंद्र पाटणकर, शाहरुख मुल्ला, रुपेश वाघमारे, अभिजित पाटील, जितू पाटील, चैतन्य पाटील, विक्रम पाटील, मुकुंद पाटील, शैलेश यादव, मयूर पाटील, युवराज पाटील, अमित पाटील, नितीन पाटील, सुरज वेटम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शांततामय आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या नेतृत्वावर कारवाई करणे आणि काँग्रेस प्रवक्त्यांवर हल्ले घडवून आणणे ही भाजप सरकारची दडपशाहीची भूमिका असून, अशा अन्यायकारक कारवायांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top