ताज्या बातम्या
अंधेरीत ‘ऑल ॲबिलिटी नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६’चे आयोजन; दिव्यांग खेळाडूंना मिळाले राष्ट्रीय व्यासपीठ महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान आणि जम्मू-काश्मीरचे संघ सहभागीफलटणमध्ये मतदानासाठी रामराजेंनी रणजीत दादांना मागितली परवानगी…..स्तन कॅन्सरवर मार्गदर्शन आणि जनजागृती करणारी ही पहिलीच कादंबरी! — डॉ. मधुकर वर्तक…… डॉ. सुनिता चव्हाण यांच्या ‘शीरो’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्नडॉ. गोरखनाथ पोळ यांना ‘शिक्षण, साहित्य व समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान! केतकी प्रकाशनच्या दिवाळी अंक २०२६ चे मुंबईत प्रकाशन; २१ मान्यवरांचा केतकी पुरस्काराने गौरवअकरावी-बारावीच्या ऑफलाइन प्रवेशासाठी संस्थांना आकारलेला पाच हजारांचा दंड रद्द करा! शिक्षक भारती संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

अंधेरीत ‘ऑल ॲबिलिटी नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६’चे आयोजन; दिव्यांग खेळाडूंना मिळाले राष्ट्रीय व्यासपीठ महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान आणि जम्मू-काश्मीरचे संघ सहभागी

मुंबई(शांताराम गुडेकर ) : दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वीरा देसाई रोड येथे १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘ऑल ॲबिलिटी नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले या स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन (DWCA) यांच्या वतीने आणि दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या आयोजनामध्ये डॉ. भगवान तलवारे यांचे महत्त्वपूर्ण नेतृत्व लाभले आहे. ते दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे जॉईंट प्रेसिडेंट तसेच स्पेशल ऑलिंपिक इंडिया, महाराष्ट्रचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.

चार प्रकारांत रंगणार चुरशीचे सामने

या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये फिजिकली चॅलेंज्ड क्रिकेट, दिव्यांग महिला क्रिकेट,कर्णबधिर आणि व्हीलचेअर क्रिकेट अशा तीन प्रकारांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि जम्मू-काश्मीर या तीन राज्यांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले असून खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. विविध राज्यांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम दिव्यांग क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

खेळाडूंसाठी विशेष सुविधा

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सोयीसाठी आयोजकांकडून निवास, भोजन आणि प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उत्तम क्रिकेट मैदान, रोख पारितोषिके, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर यांसारखी वैयक्तिक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्यात येणार असून त्यामुळे देशभरातील क्रीडाप्रेमींना या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.
दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.
‘Different Abilities, Same Passion’ अर्थात क्षमता वेगळ्या, पण खेळाची जिद्द आणि आवड एकच, या घोषवाक्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा दिव्यांग खेळाडूंच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. शारीरिक अडचणींवर मात करून क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीचे दर्शन या स्पर्धेतून घडणार आहे.
दिव्यांग खेळाडूंना सहानुभूतीपेक्षा समान संधी, सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. याच विचारातून आयोजित करण्यात आलेली ही राष्ट्रीय स्पर्धा दिव्यांग क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून मुंबईच्या क्रीडा विश्वात एक वेगळा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सदर प्रसंगी महासचिव दिव्यांग क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया हरून रशीद,स्पेशल ऑलिंपिक महाराष्ट्र च्या अध्यक्षा श्रीमती मेधा सोमय्या,शिवसेना राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी डेप्थ क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र विवेक मालशे,S4UA अध्यक्ष पूजा मेहरा,S4UA सचिव अभय तलवारे,शिवसेना माजी सैनिक सेल चे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.सरदार चोपडे,स्वाभिमानी पक्षाचे मुंबई प्रदेशअध्यक्ष श्री.मोहन वायदंडे व इतर दिव्यांग खेळाडू,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top