ताज्या बातम्या
फलटणमध्ये मतदानासाठी रामराजेंनी रणजीत दादांना मागितली परवानगी…..स्तन कॅन्सरवर मार्गदर्शन आणि जनजागृती करणारी ही पहिलीच कादंबरी! — डॉ. मधुकर वर्तक…… डॉ. सुनिता चव्हाण यांच्या ‘शीरो’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्नडॉ. गोरखनाथ पोळ यांना ‘शिक्षण, साहित्य व समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान! केतकी प्रकाशनच्या दिवाळी अंक २०२६ चे मुंबईत प्रकाशन; २१ मान्यवरांचा केतकी पुरस्काराने गौरवअकरावी-बारावीच्या ऑफलाइन प्रवेशासाठी संस्थांना आकारलेला पाच हजारांचा दंड रद्द करा! शिक्षक भारती संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारासाताऱ्यात चार मंत्र्यांची काटकसर, बांधकामच्या अधिकाऱ्यांना वाहनांचा विसर…

फलटणमध्ये मतदानासाठी रामराजेंनी रणजीत दादांना मागितली परवानगी…..

फलटण(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये राजे गट व दादा गट यांच्यामध्ये नेहमीच कलगी तुरा रंगतो. आज सकाळीच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. फलटण येथे मतदानासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आले होते. त्यापूर्वीच माजी खासदार व भाजप नेते रणजीतदादा नाईक निंबाळकर व शिवरूपराजे खर्डेकर हे मतदान केंद्रात दाखल झाले होते. रामराजेंनी मतदान केंद्रात एंट्री मारतानाच रणजीत दादांकडे पाहून जाऊ का? परवानगीने आता.. अशी साद दिली. त्याला चांगल्या प्रतिसाद देऊन रणजीत दादांनीही रामराजेंशी हस्तांदोलन करून सन्मान राखला. त्यामुळे निवडणुकीचा ताण तणाव गळून पडला. फलटण तालुक्यात सुसंस्कृत राजकारणी कसे असतात? याचे चित्र पाहण्यास मिळाले. साताऱ्यात ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे व रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकीय मतभेद व तणाव दूर करून आपुलकीने एकमेकांशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संवाद साधला. या जयराम एकीकरण सुलोख्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. फलटणमध्ये राजे व दादांच्या भेटीने फलटणच्या राजकारणाला चांगली दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी दिनांक एक नोव्हेंबर रोजी अकरा तालुक्यांतील मतदान केंद्रांवर आज सकाळी आठ वाजल्यापासुन मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. माण, पाटण, फलटण, जावळी तालुक्यांत चुरशीच्या लढती होत आहेत. पॅकिंग केल्यासारखे अकरा तालुक्यात सोसायटी सभासद मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणले जात होते . यामध्ये राज्य सरकारमध्ये असलेले सातारा जिल्ह्यातील ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकांच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सोसायटीच्या सातारा, खटाव, वाई तसेच महिला राखीवच्या दोन, कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्था मतदारसंघ, नागरी बॅंक व पतसंस्था मतदारसंघ, गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघ यांचा समावेश आहे. उर्वरित १२ जागांमध्ये एक-दोन जागा वगळता उर्वरित सर्व जागांवर चुरशीची लढत होत आहे.
पाटणला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई विरुध्द सत्यजित पाटणकर, माणला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे विरुध्द शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ, फलटणला संजीवराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक-निंबाळकर, खंडाळ्यात संजीव गाढवे विरुद्ध अजय भोसले व श्यामराव गाढवे, कऱ्हाडला अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर विरुध्द धनंजय पाटील, जावळीत ज्ञानदेव रांजणे विरुद्ध विठ्ठल गोळे, महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरे विरुद्ध संजय मोरे,
सुनील खत्री विरुद्ध सुनील माने, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग मतदारसंघातून दीपक चव्हाण विरुध्द रवींद्र बडेकर, सुरेश गायकवाड, सत्यवान कांबळे, इतर मागास प्रवर्गात योगेश फडतरे विरुध्द संदीप पाचांगणे, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग मतदारसंघात सुनील वाघ विरुद्ध अर्जुन काळे, औद्योगिक, वीणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून चंद्रकांत जाधव विरुध्द सुनील वाघ अशा लढती होत आहेत. यामध्ये सुनील वाघ यांनी चंद्रकांत जाधव यांना पाठिंबा दिलेला असल्याने त्यांची निवडणूक एकतर्फी आहे. हे यापूर्वीच जाहीर झाले आहे.
फलटण येथील श्रीमंत राणीसाहेब सौ.
लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक
निंबाळकर नगरपरिषद शाळा क्रमांक ८
मध्ये साडेनऊ वाजता मतदान करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मतदान केंद्रात प्रवेश केले . मुरब्बी राजकारणी सारखे त्यांनी हात जोडून माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर व शिवरूपराजे खर्डेकर यांना हात जोडून नमस्कार केला. जाऊ का? परवानकीने आता.. अशी विनोदाने कोपरखळी मारली. जनतेचा विचार करा. प्रयत्न करा. अशा शब्दात दाद दिली.
फलटण सारख्या संवेदनाशील मतदान केंद्रामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
यासाठी मतदान केंद्र परिसरात मोठा
पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
आहे. परंतु, राजे व दादांच्या मनमोकळ्या संवादामुळे वातावरणामध्ये चांगलाच गारवा निर्माण झाला होता. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेचे संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत आहे. या सकारात्मक दृश्याने खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व किसनवीर आबांचे विचार आजही जिवंत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.

Scroll to Top