Mumbai : धारावीसारखा विभाग आजही अतिमागासलेलाच आहे. या विभागात आजही सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण नाही. अरुंद गल्ल्या, छोटी छोटी घरे व अभ्यासाला नसलेले पुरक वातावरण ज्यामुळे धारावी विभागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी साजेसे वातावरणच मिळत नाही. मागील १६ वर्षापासून आजपर्यंत या अभ्यासिकेचा लाभ घेतलेले धारावीतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर व वकील झालेले असून अनेक विद्यार्थी खाजगी क्षेत्रात नामांकित पदांवर काम करत आहेत. विभागातील दहावी, बारावीच्या तसेच तत्सम परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना मनोहर जोशी महाविद्यालय, धारावी, मुंबई – ४०००१७ येथील अभ्यासिका म्हणजे एक पर्वणीच असून प्रशस्त अशा जागेत व सर्व सोयी सुविधायुक्त अशा अभ्यासिकेत अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपले नावलौकिक करावे असे आवाहन या अभ्यासिकेचे प्रमुख माजी विभाग युवा अधिकारी, फलटण- कोरेगांव विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख व महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रमोद बाबुराव माने यांनी केले आहे. सदर अभ्यासिका सर्वांसाठी मोफत असून दररोज संध्या. ६ ते ९ या वेळात विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. जेणेकरून त्यांना परीक्षाकाळात अभ्यासासाठी पुरेसे पातावरण मिळेल आणि शांतपणे भरपूर अभ्यास करता येईल हाच या अभ्यासिकेचा प्रमुख उद्देश आहे.



