ताज्या बातम्या

गटई व चर्मोद्योग कामगारांसाठी महापौरांच्या दालनात संयुक्त बैठकीचे आयोजन; चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट

मुंबई : संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सव समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापौर दालनात शुक्रवारी भेट घेतली. यावेळी चर्मकार समाजातील गटई व चर्मोद्योग कामगारांच्या अनेक समस्या व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने नुकत्याच मोफत स्टॉल योजने बाबत जारी केलेल्या सुधारित शासन निर्णयाच्या अंमलबाजणीला गती देण्यासाठी, महापौर दालनात समिती व संबंधित पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लावावी अशी विनंती महापौर रितू तावडे यांना शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाला उत्तर देताना चर्मकार समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन, तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लावण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी शिष्टमंडळात विजय इंगळे, देवराम केदार, ज्ञानेश्वर ठोंबरे, मनोहर खैरे व उत्तरा खैरे इत्यादी उपस्थित होते.

नुकतीच डिसेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, समितीच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन, चर्मकार समाजाच्या अनेक मागण्यांचे निवेदन दिले; या निवेदनामध्ये गटई कामगारांच्या स्टॉल संदर्भातीलही मागणी आहे. त्यानुसार गटई व चर्मोद्योग कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल देण्याच्या सुधारित योजनेला गती मिळाली आहे. तलागळतील गरजू चर्मकार बांधवाला, लाभ मिळून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी दि.28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सुधारित शासन निर्णय जारी केला आहे.

छायाचित्रात डावीकडून मनोहर खैरे, उत्तरा खैरे, देवराम केदारे, ज्ञानेश्वर ठोंबरे, विजय इंगळे व संयुक्त बैठकीचे निवेदन स्वीकारताना मुंबईच्या महापौर रितू तावडे दिसत आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top