ताज्या बातम्या

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई(शांताराम गुडेकर ) : देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पुढाकारातून ओएनजीसी आणि ऑल इंडिया एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघटनेच्या सहकार्याने, मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील सरस्वती विद्या मंदिर शाळे मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एससी आणि एसटी वार्षिक घटक योजना २०२५-२६ अंतर्गत मुंबईसहित 22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण यशस्वीरित्या पार पाडले.
देव देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव देवगिरकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे रविशंकर – ईडी, मुख्य एचआर सेवा डब्ल्यूओयू मुंबई, एनसी बलियार सिंग – जीजीएम (एचआर), मुंबई आरओ एचआर/ईआर,किरण मेश्राम – जीएम (एचआर), मुंबई आरओ, अन्नादुराई एस. – जीएम (एफ अँड ए), मुंबई आरओ फायनान्स, विवेक झिने – जीएच (एचआर), एससी/एसटीसाठी आरएलओ, पराग एस. रामटेके – अध्यक्ष, ऑल इंडिया एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघटना, मुंबई, रतन भानारकर सचिव, ऑल इंडिया एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघ, मुंबई,
श्री. रतन भानारकर, सेक्रेटरी
श्री. मिथुन गायकवाड, व्हाइस चेअरमन
श्री. गोपीचंद मौंडेकर जॉइंट सेक्रेटरी, श्री.प्रबल प्रताप सिंह सीईसी मेंबर श्री.दीपक गायकवाड
एक्झिक्युटिव्ह मेंबर, दत्तात्रय सावंत संचालक, सत्कर्म फाउंडेशन, श्रीमती. दीपाली पवार – विश्वस्त, सरस्वती विद्यामंदिर, श्रीमती. राणी मोरे – मुख्याध्यापिका, सरस्वती विद्यामंदिर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी आयोजकांनी ह्या कार्यक्रमाबाबत सांगितले कि देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पुढाकारातून ओएनजीसी आणि ऑल इंडिया एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला.
आम्ही प्रत्येक मुलासाठी सामाजिक उन्नती, सर्वसमावेशक वाढ आणि दर्जेदार शिक्षणासाठी वचनबद्ध आहोत. राज्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या उद्देशाने या सर्व संस्थाच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात आला असून जवळ जवळ 22 दुर्गम आदिवासी भागातील सोईसुविधा पासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना व शाळांना 296 बेंचेस 5 स्मार्ट इंटरॲक्टिव बोर्ड, 29 कॉम्प्युटर, 45 फळे, 7 प्रिंटर असे शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमचा लाभ मिळाला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात हातभार लावून सहकार्य केल्याबद्दल देव देश प्रतिष्ठान कडून ओएनजीसी चे आभार मान्यात आले.भविष्यातही अशा प्रकारे उपक्रम राबवून सामाजिक सर्व घटकांसाठी यथोच्छीत काम करणार असेही देव देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव देवगिरकर यांनी ह्या वेळी सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top