ताज्या बातम्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर – मुंबई उपनगरचा मेगा लिगल सर्व्हिस कॅम्प उत्साहात संपन्न

मुंबई : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर – मुंबई उपनगर व जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘मेगा लिगल सर्व्हिस कॅम्प’ हा उपक्रम आज वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे यशस्वीरीत्या पार पडला. ‘शासकीय योजना आपल्या दारी’ या संकल्पनेतून विविध शासकीय योजनांची माहिती एकत्रितपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
या कार्यक्रमास ए. एस. गडकरी (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय व चेअरमन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), सुमन श्याम (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय व गार्डियन न्यायाधीश, सिटी सिव्हिल कोर्ट, मुंबई), भारती डांगरे (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय व गार्डियन न्यायाधीश, फॅमिली कोर्ट, मुंबई) तसेच नीला गोखले (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय व गार्डियन न्यायाधीश, सिटी सिव्हिल कोर्ट, मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ यांच्या वतीने व्यसनमुक्तीविषयक पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. व्यसनांचे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत जनजागृतीपर माहितीपत्रके नागरिकांना वितरित करण्यात आली.
यावेळी नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. एकनाथ तांबवेकर, ‘विस्डम फाउंडेशन’चे प्रचारक श्री. सय्यद बुखारी तसेच मुंबई शहर संघटिका चेतना सावंत उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांची सुलभ माहिती एका छताखाली उपलब्ध झाली असून जनहितार्थ महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top