ताज्या बातम्या

डॉ. सुरज प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय ‘वैद्यकीय रत्न’ पुरस्कार जाहीर

सातारा : जिल्ह्यातील मौजे घोगाव (ता. कराड) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रकाश बाबुराव पाटील यांची सेवा परंपरा पुढे नेत त्यांचे सुपुत्र डॉ. सुरज प्रकाश पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी रशिया येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रात परतल्यानंतर वैद्यकीय शिक्षणातील वाढता खर्च लक्षात घेत विद्यार्थ्यांना परदेशात कमी खर्चात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

आजवर त्यांनी महाराष्ट्रातील तब्बल ५६१ विद्यार्थ्यांना रशियात एमबीबीएस शिक्षणासाठी मार्गदर्शन करून आर्थिक बचत व योग्य दिशा दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘धगधगती मुंबई’च्या वतीने त्यांना राज्यस्तरीय ‘वैद्यकीय रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरुण व तडफदार नेतृत्वातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रेरणादायी संदेश दिला आहे.त्यांना हा पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. सदर पुरस्कार शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह कोपरखैरणे सेक्टर चार मध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top