ताज्या बातम्या

कराडमध्ये २८ फेब्रुवारीला ‘रस्ता सुरक्षा दौड २०२६’ दुचाकीस्वार व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जनजागृतीचा अनोखा उपक्रम

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : रस्ते अपघातांमध्ये वाढत असलेल्या दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी कराड येथे ‘रस्ता सुरक्षा दौड-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘दुचाकी स्वार व पादचारी वाचवा’ हा मुख्य संदेश घेऊन ही दौड आयोजित करण्यात येत असल्याची माहिती मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविणाऱ्या विभागाने जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीपणे पार पाडले होते. त्याच अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून ही पाच किलोमीटरची जनजागृती दौड आयोजित

करण्यात आली आहे.

शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता कृष्णा घाटावरून दौडीस प्रारंभ होईल. कृष्णा घाट चावडी चौक-मुख्य बाजारपेठ-दत्त चौक-विजय दिवस चौक-कृष्णा नाका-कन्याशाळा मार्गे पुन्हा चावडी चौक आणि कृष्णा घाट येथे समारोप असा दौडीचा मार्ग निश्चित करण्यात

आला आहे.

या स्पर्धेत १५ वर्षांवरील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असून ती पूर्णपणे विनाशुल्क आहे. आयोजकांनी दिलेल्या लिंकद्वारे नावनोंदणी करता येणार आहे. एकूण दोन हजार स्पर्धकांसाठी नोंदणीची मर्यादा निश्चित

करण्यात आली आहे.

दौडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल, ई-प्रमाणपत्र तसेच नाश्त्याची सोय करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मेडलचे अनावरण तसेच ऑनलाइन नोंदणी लिंकचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मोटर वाहन निरीक्षक सुदर्शन देवढे, स्वप्नील कदम, पंचायत समिती सदस्या अनिता वेताळ, उद्योजक सचिन पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, शशिकांत पाटील, दिलीप चिंचकर, ओंकार ढेरे, ब्रिजेश रावळ, अशोक पवार आदी उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्ता सुरक्षेचा संदेश सर्वदूर पोहोचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top