ताज्या बातम्या

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जनता दल सेक्युलरचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा

मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार श्री. कौत्सुभ गावडे यांना जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

जनता दल सेक्युलर हा महायुतीचा घटक पक्ष असून केंद्रातील एनडीए आघाडीसोबत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सूचना व आदेशानुसार महाराष्ट्र पक्षाने दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उमेदवारांनीही जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेत त्यांच्याशी समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.
जनता दल सेक्युलरच्या या अधिकृत पाठिंब्यामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Scroll to Top