ताज्या बातम्या

पोलीस पाटलांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

सातारा(अजित जगताप) : स्वच्छ व पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त काम पोलीस पाटलांच्याकडून होताना दिसत नाही, तरी त्यांना अटी शर्ती व नियम घालून देण्यात याव्यात, व त्यांचे हजेरीपत्रक व हालचाल रजिस्टर ठेवणे सक्तीचे करण्यात यावी . तसेच पोलीस पाटलांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केल्याने खळबळ माजली आहे.
सातारा जिल्ह्यातील महसुली गावात पोलीस पाटील हे गावात असले पाहिजे. याची दक्षता व्हावी, प्रत्येक पोलीस पाटलांचे हजेरी पत्रक प्रांत अधिकारी कार्यालय व बी.डी.ओ. व संबंधित गावचे ग्रामपंचायतला ठेवण्यात यावे, पोलीस पाटलांच्या सह्या समक्ष व्हाव्यात, तसेच काही पोलीस पाटील बाहेर नोकरी करतात व शासनाचे पगार भत्ते येथे घेतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, पोलीस पाटील व त्यांच्या नातेवाईकांच्या कडून गुन्हेगारी सावकारी व्यवसाय, गोरगरिबांच्या मिळकती बळकवण्याचे प्रकार होत असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस पाटील हे सरकारी असल्याने त्यांना देखील माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू करावा, पोलीस पाटील त्यांचे हालचाल रजिस्टर व कम्पलेट बुक नोंद प्रांत कार्यालय, पंचायत समिती व ग्रामपंचायतला ठेवण्यात यावे, पोलीस पाटील पद महिलेकडे असल्यास त्याच्या नातेवाईकांनी कोणताही हस्तक्षेप करू नये, पोलीस पाटील यांनी आठवड्यात कोणती कामे केली व कोणते तंटे मिटवले? यासंबंधी नोंद ठेवण्यात यावी, तसेच यांच्या स्थावर जंगम मालमत्तांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे,
या निवेदनामध्ये अनेक विषय मांडले असून, सदरचे निवेदन बैलगाड्या शर्यत लढ्याचे नेते व शेतकरी संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष धन्यकुमार जाधव, व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले असून, या निवेदनावर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, दक्षिणचे अध्यक्ष संजय थोरात, सामाजिक कार्यकर्ते उत्तम पोळ, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळवे (बापू ), माजी कराड तालुका अध्यक्ष प्रवीण उथळे पाटील, अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष अस्लम गुंडूलाल कालेकर, आंबेकरी, रूपाली पोळ, महादेव देसाई, चंद्रकांत देशमुखे, धानाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष अजित थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव खबाले, यांच्या सह्या असून त्यांनी पोलीस पाटलांच्या गैर कामाबद्दल तक्रारी, शासनाकडे व प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत, तसेच तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
—————————————–
महत्वपूर्ण चौकट–
गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या पाठीशी शेतकरी संघटना ठाम आहे. त्यांना दरवर्षी चांगल्या कामाबद्दल वेतन वाढ द्यावी व त्यांनाही राज्य शासनाच्या वतीने आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सुरू करावा. चांगल्याला चांगले आणि वाईट काम करणाऱ्या पोलीस पाटलांनी सुधारणा करावी. हाच शेतकरी संघटनेचा हेतू असल्याचे श्री धन्यकुमार जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

_______________________________&

सातारा जिल्ह्यातील पोलीस पाटलांची सखोल चौकशी करण्याचे शेतकरी संघटनेचे निवेदन जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांना देताना (छाया- अजित जगताप सातारा)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top