सातारा : विकासरत्न स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले आध्यात्मिक ज्ञानपीठ व श्री विठ्ठलधाम प्रतिपंढरपूर, क्षेत्र आंबेघर यांच्या वतीने राजधानी भक्तिमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २६ डिसेंबर २०२६ ते शुक्रवार, १ जानेवारी २०२७ या कालावधीत श्रीकोटेश्वर मैदान, सातारा येथे हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. या महोत्सवात ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम यज्ञ, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ह.भ.प. श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर आणि ह.भ.प. श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभणार आहेत. पारायणाचे नेतृत्व पारायणाचार्य ह.भ.प. एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.
साताऱ्यात २६ डिसेंबरपासून राजधानी भक्तिमहोत्सव
November 22, 2026 / 1 minute of reading




