ताज्या बातम्या

बाबाराजेंना दुय्यम ठरवण्याचा डाव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी- सौरभ शिंदे

कुडाळ(अजित जगताप) : महाराष्ट्रातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठांच्या जागावाटपाच्या राजकारणावर जावळीचे सभापती सौरभ शिंदेंचा थेट निशाणा साधला आहे. समाज माध्यमावर पोस्ट टाकणारे शेखर पाटोळे यांनी महायुतीतील अंतर्गत राजकारणाचा हिशेब द्यावा अशा शब्दात जावळी पंचायत समितीचे भाजपचे सभापती सौरभ शिंदे यांनी तीव्र भावना व्यक्त केले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जावळीत उमटलेला मतदानाचा कौल हा केवळ आकड्यांचा खेळ नसून महायुतीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या राजकीय कुरघोड्यां विरोधी प्रतिक्रिया आहे. कार्यकर्त्यांच्या मनात साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. जागा वाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातारा जिल्हा बँकेच्या जागा वाटपाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला. महायुतीच्या अंतर्गत राजकारणात त्यांना डॉमिनेट करण्याच्या हालचाली झाल्याची भावना सातारा- जावळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. ही नाराजी आदरणीय बाबाराजे तथा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावरही घालण्यात आली होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी मंत्री बाबाराजे तथा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतःच्या राजकीय ताकदीचा विचार केला नाही. तरीही महायुतीतील काही उमेदवारांच्या बाबत जिल्हा बँकेच्या मतदारांच्या मनातील नाराजी मतपेटीतून बाहेर आली आहे . जावळी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या मतदानाचे खापर स्थानिक नेतृत्वावर फोडण्यापेक्षा महायुतीतील वरिष्ठांच्या अंतर्गत कुरघोड्यांचा आधी हिशेब द्या, अशा शब्दांत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी शेखर पाटोळे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जिल्हा बँकेच्या आरक्षण जागेच्या संचालक पदासाठी अर्जुन काळे यांना जावळी मतदारसंघातून अपेक्षित मतदान का मिळाले नाही? यावरून शेखर पाटोळे यांनी बाबाराजेंच्या गटाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. मात्र, जावळीतील मतदाना बाबत दुसऱ्यांवर आरोप करणे म्हणजे स्वतःच्या राजकीय अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचाही पलटवार सौरभ शिंदे यांनी केला आहे.

जागावाटपातच मतदारांची संख्या असूनही बाबाराजे बाबत अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये झाली होती. याची सर्वस्व जबाबदारी राजेंवर जर कोणी मारत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही खबरदार आमचे दैवत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर जर एक शब्द जरी बोलाल तर याद राखा.
महायुतीच्या जागावाटपाच्या प्रक्रियेत बाबाराजेंना अपेक्षित सन्मान आणि राजकीय महत्त्व दिले गेले नाही, त्याचे फलित संबंधितांना मिळाले आहे. अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. बाबाराजेंना दुय्यम ठरवण्याचा हा असंतोष केवळ निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला नव्हता, तर जागावाटपाच्या प्रक्रियेपासूनच त्याची ठिणगी पडली होती. त्याचा भडका उडाला आहे. भाजप प्रमुख कार्यकर्त्यांनी ही नाराजी बाबाराजेंच्या कानावर घातली होती. मात्र, त्यांनी व्यक्तिगत राजकीय प्रतिष्ठेपेक्षा महायुतीचा धर्म आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द महत्त्वाचा मानला. त्यांच्याकडे ४५० मतांची निर्णायक मताधिक्य होते. तरीही वरिष्ठने घेतलेल्या निर्णय मान्य केला. निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्राला भेटी दिल्या.

जावळी- सातारा तालुक्यात बाबाराजेंनी महायुतीतील समन्वय बिघडू नये, यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखून महायुतीतील एकजूट टिकवून ठेवली आहे. अनेक समर्थकांची समजूत काढून त्यांना भाजपच्या उमेदवाराला मत देण्यास भाग पाडले. अर्जुन काळे यांच्या उमेदवारीला प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र, मतदारांच्या मनात असलेली नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली. याचा अर्थ बाबाराजेंनी विरोधी भूमिका घेतली, असा काढणे म्हणजे वस्तुस्थितीपासून पळ काढण्यासारखे आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका करण्याच्या आधी महायुतीतील कुरघोड्यांचा हिशेब द्या! मगच आपले वाचाळ तोंड उघडा
ज्यांनी जागावाटपात बाबाराजेंना दुय्यम स्थान मिळेल, अशी परिस्थिती निर्माण केली, ज्यांनी त्यांच्या राजकीय ताकदीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला, जावळीतील जिल्हा बँकेतील निवडणुकीत मतांचा हिशेब मागण्यापूर्वी महायुतीतील वरिष्ठ पातळीवर नेमके काय राजकारण झाले?, याचे आत्मपरीक्षण शेखर पाटोळे यांनी करावे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय

संघर्षाचा आदर नक्कीच आहे पण, जावळीचा स्वाभिमानही तितकाच मोठा आहे .जर जावळीच्या स्वाभिमानाला आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाला कुठेही टीकेतून वाचाळ वाचा केली तर जावळीच्या स्वाभिमानाला कुठेही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देण्याची आमची देखील तयारी आहे. वेळ, जागा ठरवा. तिथे आम्ही येऊ असा इशारा देखील सौरभ शिंदे यांनी दिला आहे. मंत्री
जयकुमार गोरेंच्या राजकीय संघर्षाबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. जावळीनेही अनेक राजकीय संघर्ष पाहिले आहेत आणि प्रसंगी मोठमोठ्या राजकीय शक्तींना आपली ताकद दाखवून दिली आहे. बाबाराजेंच्या पाठिंब्यामुळे राजकीय मैदानात उतरलेल्या लोकांनी आज त्याच जावळीला आत्मपरीक्षणाचे धडे देणे हास्यास्पद आहे. बाबाराजेंच्या मनाचा मोठेपणा म्हणजे त्यांची राजकीय ताकद कमी झाली, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. असेही प्रसिद्धी पत्रकात सौरभ शिंदे यांनी नमूद केले

Scroll to Top