सातारा(अजित जगताप)दि.१८: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सातारा येथील बस स्थानका शेजारील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक २० व शनिवार दिनांक२१ फेब्रुवारी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली असून याचा लाभ ग्राहक घेत आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाघाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे- पवार, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी खोऱ्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, माण- खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहेत.
कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मुग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पारंपारिक पद्धतीमधील भवरा तसेच इतर पौष्टिक कडधान्य त्याचबरोबर पापड, लोणचे आणि चटणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेंद्रिय खतावर निर्मिती केलेल्या या धान्यामुळे खऱ्या अर्थाने पौष्टिक धान्य उपलब्ध होत आहे.
—– —— ——- ——- ——- ——-;;;;—–
फोटो– पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन करताना सातारा जिल्हा अधिकारी श्री संतोष पाटील व जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे पवार (छाया– अजित जगताप सातारा)




