प्रतिनिधी : शिवशंभो शिवजन्मोत्सव समिती 18 ‘A’तर्फे यंदाचा शिवजन्मोत्सव उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचे संस्थापक दत्तात्रय फडतरे यांच्या प्रेरणेतून समितीची स्थापना झाली. अध्यक्ष गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाची जय्यत तयारी केली. सचिव नितीन पवार यांनी कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की, शिवप्रतिमा पूजन, अभिषेक, पालखी सोहळा, शिवचरित्र वाचन तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.
खजिनदार प्रभाकर माने यांनी आर्थिक नियोजनाची जबाबदारी सांभाळली असून पारदर्शकतेवर भर दिला जाणार आहे. कार्याध्यक्ष जगन्नाथ जाधव व जीवन चोरगे यांच्या पुढाकारातून युवकांसाठी विशेष स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्रमुख सल्लागार म्हणून त्रिंबक लोंढे, धनाजी भोसले, काशिनाथ आरवटू, बाळू हवलदार आणि मारुती निकम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सर्व सभासद व शिवभक्तांच्या सहकार्याने हा सोहळा दिमाखात पार पडला.
परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.




