ताज्या बातम्या

गोकुळ कॉम्प्लेक्स मध्ये भगव्यांचा जल्लोष; परिसर दुमदुमला जयघोषांनी

पनवेल(अमोल पाटील) : आजीवली तालुका पनवेल येथील गोकुळ कॉम्प्लेक्स परिसरात भगव्या झेंड्यांचा भव्य जल्लोष पाहायला मिळाला. संपूर्ण परिसर भगव्या पताका, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईने नटला होता. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे सुरुवात झाली. पाळणा व शिवरायांची आरती करण्यात आली. त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा,लहान मुलांनी केलेली वेशभूषा, पोवाडा,नृत्य, लाठी काठी व गाणी यामुळे कार्यक्रमाला रंगत आली. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक देऊन प्रेरणादायी उपक्रम करण्यात आला.उपस्थितांनी भगवे फेटे व शाल परिधान करून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी शिवव्याख्याते सुदर्शन सोनवणे यांच्या शिव व्याख्यानामुळे महाराजांचा इतिहास मांडला.समाजातील मान्यवरांनी शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि एकतेचा संदेश देणारी भाषणे केली. शेवटी भव्य रॅली काढून महाराजांचे आरती करून कार्यक्रमास हातभार लावण्याचे आभार मानत सांगता केली.
गोकुळ कॉम्प्लेक्समधील या उत्साही जल्लोषामुळे परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांनी दरवर्षी अशाच उत्साहात कार्यक्रम साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top