ताज्या बातम्या
जात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी जुन्या शालेय नोंदींच्या डिजिटल जतनाची मागणी; आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदनसोळशी विभाग विकास सेवा सहकारी सोसायटीतून सौ. शारदा संजय गायकवाड यांची बिनविरोध निवड; १०५ गाव समाज संघटनेच्या एकजुटीचा विजयराज्य मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, राज्यात ५ नवीन न्यायालयांना मंजुरी‘दीपावली’ ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक; मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठित स्पर्धेचा निकाल जाहीरसीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार

जी-उत्तर विभागात विशेष स्वच्छता मोहीम; रस्ते, फुटपाथ चकाचक – धुळीवर नियंत्रण

मुंबई :

मुंबई महानगरपालिकेच्या बृहन्मुंबई महानगरपालिका जी-उत्तर विभागात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील मुख्य व उपरस्ते स्वच्छ आणि धुळीमुक्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रगत परिसर व्यवस्थापन (ALM) सदस्य आणि पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवून ब्रशिंग, स्वीपिंग तसेच पाण्याने धुलाई करण्याच्या सूचना ALM प्रतिनिधींनी मांडल्या होत्या.
सूचनांनुसार जी-उत्तर विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षकांनी तत्काळ कृती आराखडा तयार करत आपल्या अखत्यारीतील प्रमुख रस्ते, उपरस्ते तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरील मार्गांची निवड केली. महिनाभर सातत्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत रस्ते झाडणे, ब्रशिंग करणे, पाण्याने धुणे, दुभाजक, फुटपाथ आणि वॉटर टेबल स्वच्छ करणे अशी व्यापक कामे करण्यात आली. परिणामी परिसरातील धुळीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही विकासकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. त्यामुळे वाढत्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश आले आहे. या समन्वित उपक्रमामुळे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

Scroll to Top