सातारा : जिल्हा परिषद सातारा यांचे मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजयंती महोत्सव किल्ले प्रतापगड या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ह.भ.प सागर पवार,क्षेत्रमाहुली, सातारा यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
दरवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी किल्ले प्रतापगड या ठिकाणी भव्य दिव्य शासकीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात येतो. या वेळी ह.भ.प सागर पवार शिवचरित्रावर सकाळी 9.00 वा व्याख्यान देणार आहेत.ह.भ.प सागर पवार हे झी टॉकीज च्या माध्यमातून घरोघरी पोहचलेले असून त्यांच्या वाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत.किल्ले प्रतापगड या ठिकाणी शासकीय शिवजयंती सोहळ्यामध्ये तीन वेळा प्रमुख वक्ते पद भूषवणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच वक्ते आहेत. या कार्यक्रमावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,सर्व नूतन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, सर्व विभाग प्रमुख,सर्व गट विकास अधिकारी,सर्व गटशिक्षणाधिकारी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.




