मुंबई – शहीद भगत सिंह पुस्तकालय, भायखळा आणि केतकी प्रकाशन प्रा. लि. शहीद भगत सिंह पुस्तकालय व केतकी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं ४ ते ७ या वेळेत ५४ बी, नारायण भुवन, ना. म. जोशी मार्ग, पहिली क्रॉस लेन, ग्रॅज्युएट वडापावच्या वरती, भायखळा (पश्चिम), मुंबई – ४०००२७ येथे पार पडणार आहे.
सदर पुस्तकालयाची स्थापना २३ मार्च २०२४ (शहीद दिन) रोजी करण्यात आली असून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती आणि राष्ट्रपुरुषांविषयी अभिमान जागवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जात आहेत.
स्पर्धेचे गट व विषय
स्पर्धा दोन गटांत होणार आहे –
गट १ – प्राथमिक (इयत्ता ४ थी ते ७ वी)
शिवाजी महाराजांचे बालपण
शिवाजी महाराजांचे गड-किल्ले
रयतेचा राजा शिवाजी महाराज
मी रायगड बोलतोय…
गट २ – माध्यमिक (इयत्ता ८ वी ते ११ वी)
लोकशाहीतही का आठवावे शिवाजी महाराज
गनिमी कावा : एक युद्धनीती
महाराजांची स्त्रीविषयक भूमिका
शिवाजी महाराज आणि मराठी भाषा
आकर्षक पारितोषिके
प्रत्येक गटात तीन मुख्य पारितोषिके व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
प्रथम क्रमांक – ₹१००१/-, द्वितीय क्रमांक – ₹७५१/-, तृतीय क्रमांक – ₹५०१/-, उत्तेजनार्थ – ₹२५१/- अर्ज सादरीकरण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे/अर्ज स्पर्धा स्थळी सायं ५ ते ८ या वेळेत सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं ८ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२००२६९३८.
भायखळा विभागातील पालकांनी आपल्या पाल्यांना या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




