तापोळा(अजित जगताप) : महाबळेश्वर जावळी तालुक्याला विकास कामांमध्ये आर्थिक पाठ्य बळ शासनाच्या वतीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय स्वर्गीय अजित दादा पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील त्यांच्या प्रयत्नाने या पुलाचे काम होत असून या तापोळा केबल स्टेप पूर्ण झाल्यानंतर या पुलाला स्वर्गीय अजित दादा पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी तापोळा परिसरातून पुढे आली आहे.
आती दुर्गम व मागास भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी उपलब्ध झाला आहे. विकास कामांसाठी राज्याचे वजनदार मंत्री म्हणून स्वर्गीय अजित दादा पवार यांचे खूप मोठे योगदान होते . सध्या तापोळा येथील पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचे खूप मोठे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच खऱ्या अर्थाने अंदाजे १८० कोटी रुपये खर्च करून या पुलाच्या बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या या पुलाच्या सर्व खांबाचे व केबलचे काम पूर्ण झाले आहे अंदाजे आतापर्यंत दीडशे कोटी रुपये खर्च झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून या कामाची वेळोवेळी पाहणी होत आहे. यावर्षी या शिवसागर जलाशयातील केबल स्टेप पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कृषी पर्यटन उभारण्यात येऊन स्थानिक यांना रोजगार उपलब्ध केला आहे. पर्यटन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर मंडळी लक्ष ठेवून आहेत. नैसर्गिक साधनसामुग्री असलेल्या अति दुर्गम व मागासलेल्या भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. या पुलामुळे जलद गतीने या भागात पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. वेळेची बचत होत असल्याने अनेक पर्यटकांना वाहन चालवताना समाधान लाभणार आहे. दळणवळणाचे साधन उपलब्ध झाल्यामुळे स्थानिकांनाही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
आधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ‘केबल स्टे’ पूल.
उद्देश: महाबळेश्वर-तापोळा परिसरातील पर्यटनाला चालना देणे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे. त्याचबरोबर बोटिंग आणि निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सुमारे ५० किलोमीटरच्या अंतरावर पर्यटकांना मन मुराद निसर्गाचा आनंद मिळणार आहे. हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने दुहेरी फायदा होणार आहे.
शिवसागर जलाशयात उभारण्यात आलेल्या केबल स्टेप पूल ५४० मीटर लांबीचा असून, केबल स्टे पूल आणि ४३ मीटर उंचीवरील प्रेक्षागृह ही या पुलाची वैशिष्ट्ये ठरले आहे. या ठिकाणी सेल्फी पॉइट होणार असून पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. आतापासूनच फोटो सेशन सुरू झालेले आहे. दरम्यान या केबल स्टेप फुलाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा महाबळेश्वरचे माजी सभापती अमितदादा कदम, सुभाष कदम
यांच्यासह पर्यटनाला आलेले खारघर येथील पर्यटक सचिन जगताप, शुभम कांबळे, रमेश अनिल उबाळे यांनी केली आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
______________________________________
फोटो– तापोळा येथील शिवसागर जलाशयांमधील केबल स्टेप पुलाचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम. (छाया– अजित जगताप ,तापोळा)




