ताज्या बातम्या

महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेणाऱ्या सौ. अनुजा दांडगे यांना राज्यस्तरीय ‘उद्योजिका रत्न’ पुरस्कार जाहीर

नवी मुंबई : उद्योजकतेतील उल्लेखनीय कार्य, महिलांना प्रेरणा देणारी वाटचाल आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये सौ. अनुजा कौतिक दांडगे यांना मानाचा राज्यस्तरीय ‘उद्योजिका रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
२०१७ साली दादर येथील मध्यवर्ती ठिकाणी ‘महाराष्ट्र बाजारपेठ’ची छोटीशी सुरुवात करत त्यांनी आज एक भक्कम व्यासपीठ उभे केले आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर कार्यरत असलेल्या या बाजारपेठेत घरगुती जीवनावश्यक वस्तू अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जातात. आज या उपक्रमाशी एक लाखांहून अधिक सभासद जोडले गेले असून, सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आकर्षक पारितोषिके, सहलींचे आयोजन, लकी ड्रॉद्वारे पैठणी, सोन्याची नथ व इतर भेटवस्तूंचे वितरण अशा उपक्रमांमुळे महिलांचा उत्साह वाढताना दिसतो. रक्षाबंधन उत्सव आणि महाराष्ट्र बाजारपेठेचा वर्धापन दिन हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
व्यवस्थापकीय संचालक म्हणून सौ. अनुजा दांडगे या महिलांशी घरच्यासारखे नाते जपत त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याला त्यांचे पती डॉ. कौतिक दांडगे (अध्यक्ष, महाराष्ट्र बाजारपेठ) यांचेही मोलाचे सहकार्य लाभते. गेल्या नऊ वर्षांत महाराष्ट्र बाजारपेठेची उलाढाल झपाट्याने वाढवण्यात सौ. दांडगे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून धगधगती मुंबई परिवारातर्फे त्यांना ‘उद्योजिका रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४ व ५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सौ. अनुजा दांडगे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top