कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : येवती ता. कराड येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती हिराबाई मारुती सूर्यवंशी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने येवती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कष्टाळू, प्रेमळ व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. येवती येथील प्रसिद्ध हॉटेल हरिओम उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या परिश्रमामुळे व्यवसायाला भक्कम पायाभरणी मिळाली होती.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून रक्षा विसर्जन शुक्रवार दि. १३ रोजी येवती येथील वैकुंठभूमीत करण्यात येणार आहे.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.




