ताज्या बातम्या

रायगड मधील पळस्पे जिल्हा परिषदेत अतुल घरात यांची विक्रमी मतांनी विजयी

पनवेल(अमोल पाटील) : रायगड मधील पळस्पे जिल्हा परिषदेत भाजपचे उमेदवार हर्षदा अतुल घरात यांनी ६८२९ मताने विक्रमी विजय नोंदवला आहे. पळसपे जिल्हा परिषदेत गावोगावी जाऊन प्रचाराची राळ उडवली. आठवणीची गरोदर असताना हर्षदा घरत यांनी डोंगर कपाऱ्यातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचून आत्मविश्वास दाखवला.प्रत्येक मतदारांचा विश्वास संपादन केला व सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. याच विश्वासावर रायगड मध्ये विक्रमी मतांच्या विजयाची नांदी ठरली. शेकापच्या अस्मिता ढवळे यांना 9195 मते मिळाली तर हर्षदा अतुल घरत यांना 16024 एवढी मते मिळाली. यामध्ये जिल्हा परिषदेत 6829 मतांच्या विक्रमांनी रायगड मध्ये रेकॉर्ड ब्रेक केले.
अतुल घरात यांनी श्रेय वरिष्ठ पक्षश्रेष्ठी , सर्व सहकारी , सामान्य जनता व ग्रामस्थ यांना दिले. या पाठीमागे सामान्य जनतेने दिलेले प्रेमामुळे सामान्य जनतेचे आभार मानले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top