कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) कराड येथील जुन्या कोयना ब्रिटिश पुलावर मंगळवार दि 10 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पणे एका एक्टिवा गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे सदर गाडीने पेट घेतला या आगीत एक्टिवा गाडी पूर्णपणे जळून खाक झाली, सदर घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर कराड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्याचा टँकर आणून सदर आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.




