ताज्या बातम्या

आपुलकी ग्रुपकडून नवनिर्वाचित जि. प. सदस्य अजित संकपाळ यांचा भव्य सत्कार सोहळा

तापोळा(नितीन गायकवाड) : जिल्हा परिषद तळदेव गटातून प्रचंड बहुमताने निवडून आलेले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजित दादा संकपाळ, तसेच पंचायत समिती सदस्य संजय शेलार आणि संजय मोरे यांचा भव्य स्वागत व सत्कार सोहळा आपुलकी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
तापोळा परिसरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आपुलकी ग्रुपने निवडणुकीदरम्यान अजित दादा संकपाळ यांना जाहीर पाठिंबा दिला होता. सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रुप सदस्यांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे अजित दादांचा झालेला विजय ऐतिहासिक ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
या विजयाच्या निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी हॉटेल कृष्णा गार्डन येथे भव्यदिव्य सत्कार व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आपुलकी ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य व युवकांचे प्रेरणास्थान संतोष मोरे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम बंटी शेठ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गायकवाड करणार आहेत, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी रमेश धनावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या सत्कार सोहळ्यादरम्यान नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देत, परिसराचा सर्वांगीण विकास, तसेच तापोळा विभागात पर्यटन वाढीसाठी नवनवीन विकास योजना राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top