ताज्या बातम्या

विकासाच्या बुलडोझरखाली माणुसकी चिरडली! अलिबागमध्ये वृद्ध आजीचं आयुष्य जमीनदोस्त – प्रशासन, लोकप्रतिनिधी गायब

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील उसर परिसरात नवीन मेडिकल कॉलेजच्या नावाखाली एका वृद्ध आजीचं घर प्रशासनाने बुलडोझरने जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण आयुष्य घालवलेलं घर पाडताना वृद्ध महिलेच्या अश्रूंना कुठलीही किंमत देण्

यात आली नाही. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. एकीकडे असहाय वृद्ध महिला आणि दुसरीकडे सत्ता, पोलीस व बुलडोझर असा एकतर्फी संघर्ष पाहायला मिळाला. विकास आवश्यक असला तरी तो गरिबांच्या आणि वृद्धांच्या छाताडावरूनच होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्याय, पुनर्वसन किंवा संवाद याबाबत कोणताही गांभीर्याने विचार न झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेवेळी अलिबागचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पूर्णपणे गायब असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज एका वृद्ध आजीचं घर पाडण्यात आलं, उद्या कुणाचं, असा प्रश्न उपस्थित करत ही कारवाई माणुसकीवरचा घाव असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top