ताज्या बातम्या

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला

कराड (वार्ताहर) कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला चढवला.

तालुक्यातील शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अधिराज यांना दुखापत झाली असून ते जखमी आहेत.
कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी रात्री या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिराज शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तेथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते परत येत होते.

धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते. उंडाळे ते शेवाळेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेत अधिराज पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अधिराज यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.
या घटनेनंतर धनाजी पाटील व अधिराज पाटील हे तातडीने लोकवस्तीत आले. त्यांना उपचारासाठी उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top