ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

चेंबूरमध्ये ‘वैष्णवी कलाकृती आणि गणराया साडी स्टुडिओ’चा दिमाखदार शुभारंभ

प्रतिनिधी : चेंबूर स्टेशन परिसरात ‘वैष्णवी कलाकृती आणि गणराया साडी स्टुडिओ’ या नावाने नव्या साडी व्यवसायाचा शुभारंभ संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पार पडला. श्रीमती चारुशीला घोलम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्टुडिओचे उद्घाटन लावणी कलावंत महासंघाच्या अध्यक्षा कविता घडशी, ‘लावण्य दरबार’ फेम विद्या सदाफुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संतोष लिंबोरे पाटील, जयेश चाळके, पत्रकार भिमराव धुळप यांच्यासह अनेक नामवंत लावणी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या व्यवसायाला शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.
या साडी स्टुडिओमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनच्या कांजीवरम व पैठणी साड्या उपलब्ध असून, या साड्या श्रीमती चारुशीला घोलम यांनी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत. उत्कृष्ट रंगसंगती, नक्षीकाम आणि दर्जेदार कापडामुळे हा संग्रह ग्राहकांना विशेष भावणारा ठरत आहे. लग्नकार्य, सण-समारंभ तसेच खास प्रसंगांसाठी योग्य अशा साड्यांचा येथे सुंदर संग्रह पाहायला मिळतो.
चेंबूर व परिसरातील साडीप्रेमींनी ‘वैष्णवी कलाकृती आणि गणराया साडी स्टुडिओ’ला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रीमती चारुशीला घोलम यांच्याशी मोबाईल क्रमांक ९६१९७ १९४८१ वर संपर्क साधावा.

Scroll to Top