ताज्या बातम्या

विशेष सहाय्य योजनांची केवायसी (KYC) न केल्यास पेन्शन बंद होणार – तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) कराड तालुक्यातील ११५११ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची पेन्शन सुरु आहे. सदरची पेन्शन डीबीटी (DBT) संगणक प्रणालीव्दारे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होते. डीबीटी (DBT) संगणक प्रणाली अंतर्गत पेन्शन जमा होणेकामी लाभार्थ्यांची केवायसी (KYC) होणे आवश्यक आहे.

कराड तालुक्यातील ७७२ लाभार्थी यांनी अदयापही केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण केलेली नाही. सदर लाभार्थ्यांना शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देऊनही सदर लाभार्थी हे आधार प्रमाणिकरणासाठी या कार्यालयात आलेले नाही किंवा त्यांनी केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण ही केलेली नाही. सदर केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण न केलेल्या लाभार्थ्यांना या कार्यालयाकडून लेखी पत्र देऊन मुदतीत केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण करावी अन्यथा पेन्शन बंद होणार असलेची माहिती कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, यांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील लाभार्थ्यांना दरमहा डीबीटी (DBT) संगणक प्रणालीव्दारे पेन्शनचे वाटप करणेत येते. परंतु कराड तालुक्यातील केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण न केलेले लाभार्थी लाभापासुन वंचित राहत आहेत. यासाठी शासनाने लाभार्थ्यांना केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण करणे सक्तीचे केले आहे.

विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेचे लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शासनाने दिनांक २४/१२/२०२५ ते १५/०१/०२६ या कालावधीत आधारकार्डसह तहसिल कार्यालयात उपस्थित राहणेबाबत लेखी कळवूनही कराड तालुक्यातील तब्बल ७७२ लाभार्थी यांनी केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण न केलेमुळे वंचित आहेत.

त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अदयापही केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण केलेले नाही त्यांनी दिनांक २०/०२/२०२६ अखेर तहसिल कार्यालय कराड (संजय गांधी शाखा) येथे त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, दिव्यांग लाभार्थी असल्यास युडीआयडी (UDID) कार्ड घेऊन उपस्थित रहावे. सदर कालावधीपर्यंन्त जे लाभार्थी केवायसी (KYC) आधार प्रमाणिकरण करणार नाहीत व जे दिव्यांग लाभार्थी युडीआयडी (UDID) सादर करणार नाहीत त्या लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top