ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटपस्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रकचे उद्घाटनबॉम्बे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांची कठोर भूमिकाखेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संताप

कराडच्या भूमी अभिलेख कार्यालयातील एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : कराड,गृह कर्जाचा बोजा मालमत्ता पत्रिका नोंद करण्यासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे परीक्षण भूमापक कुंडलिक खंडू मोडक (वय 38) याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
आरोपी लोकसेवक कुंडलिक खंडू मोडक वय वर्षे -38 वर्ष पद-परिरक्षण भूमापक, (वर्ग- 03), नेमणूक उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कराड, सध्याचा पत्ता-राजनंदिनी रेसिडेन्सी, होल कॉलनीचे मागे कराड. जि. सातारा. तर कायमचा पत्ता- मु पो खटकाले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी त्यांच्या गृहकर्जाचा बोजा मालमत्ता पत्रकी नोंद करण्यासाठी, भूमी अभिलेख कार्यालयातील कुंडलिक खंडू मोडक, पद-परिरक्षण भूमापक हे 10,000/- रु लाचेची मागणी करत असल्याची तक्रार ला.प्र. वि. पुणे विभागास दिनांक 03/02/2026 रोजी प्राप्त झाली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 03/02/2026 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी कुंडलीक मोडक, परिरक्षण भूमापक यांनी 10 हजार रुपये लाच रक्कम मागणी करून, तडजोडी अंती 7,000/-रुपये लाचेची मागणी केली.
आज दिनांक 03/02/2026 रोजी कराड येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कुंडलिक खंडू मोडक, पद -परिरक्षन भूमापक यांनी तक्रारदाराकडून 7,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

Scroll to Top