ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

श्री निनाई देवी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; वैष्णवी वीर हिचे वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश

कराड(प्रताप भणगे) : कै. सौ. द्वारकाबाई तुकाराम सुक्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धा दि. २४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये श्री निनाई देवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली.
यातील वक्तृत्व स्पर्धेत श्री निनाई देवी विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी विनोद वीर हिने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
या यशासाठी तिला विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षक श्री. आनंदराव जानुगडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कल्याण कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, शिवाजी नलवडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच वैष्णवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव सर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव माने, तसेच तुळसण, विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top