ताज्या बातम्या

जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडी येथे विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिलचे वाटप

विठोबाचीवाडी (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत म्हणून पाटी-पेन्सिलचे वाटप करण्यात आले. ठाणे येथील श्री. अभय बाजीराव पिसाळ आणि श्री. सचिन शिवाजी नलावडे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, शैक्षणिक साहित्याअभावी त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, या सामाजिक भावनेतून त्यांनी हा उपक्रम आयोजित केला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अभय पिसाळ व सचिन नलावडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रोत्साहन मिळते. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Scroll to Top