महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : सातारा जिल्हा परिषद व महाबळेश्वर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत आज मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ हा नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी २.२३ वाजेपर्यंत खालील उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघार घेतल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे.
अर्ज माघार घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
गट क्र. ३४ तळदेव – रेणुका अजित संकपाळ (अपक्ष)
गट क्र. ३५ भिलार – सुरेश कोंडीराम सपकाळ (अपक्ष)
गण क्र. ७० भिलार – कौसल्या संभाजी भिलारे (अपक्ष)
भिलार गट – कांचन अभय सावंत (अपक्ष)
मेटगुताड गण – चंद्राबाई वसंत चोरमले (अपक्ष)
भिलार गट – सचिन सुरेश सपकाळ
भिलार गण – वैशाली बिपीन भिलारे
भिलार गण – सविता रामचंद्र गोळे (अपक्ष)
अर्ज माघारीनंतर महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून आता उर्वरित उमेदवारांच्या प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. पुढील अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर होणार आहे.




