कराड : ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे संचलित श्री निनाई देवी विद्यालय, तुळसण येथील विद्यार्थिनी कु. अनुष्का आनंदा करांडे हिने शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे आयोजित १७ वर्षांखालील शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत अनुष्काने तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या शानदार कामगिरीच्या जोरावर तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला श्री. दत्ता पाटील काले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. आनंदरावजी पाटील, सर्व संचालक, निरीक्षक प्राचार्य बी. आर. पाटील, बादशाह शेख, मुख्याध्यापक एस. एन. शेवाळे, शिक्षकवृंद तसेच श्री निनाई देवी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव पाटील व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.




