महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका व भिमक्रांती युवक संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने साजरा करताना ज्या-ज्या ठिकाणी ध्वजारोहण केले जाते, त्या-त्या ठिकाणी भारतीय संविधानाचे वाचन झाले पाहिजे, ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमास महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीनेही पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष एकनाथ भालेराव, सरचिटणीस अनिल सपकाळ, भिमक्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष उत्तम शेठ भालेराव यांच्यासह प्रकाश सकपाळ, संपत मोरे, रवींद्र भालेराव, सखाराम कदम, राजेश भालेराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




