ताज्या बातम्या

कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

नवी मुंबई : कराड स्थापना १९९७ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई यांच्या वतीने आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर रविवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उत्साहात पार पडले.
हे रक्तदान शिबीर चॅनल टॉवर, प्लॉट नं. ७५, सेक्टर नं. १८, गुलाबसन्स डेअरी समोर, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. आनंदराव तुकाराम कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्र. १२ श्री. ज्ञानदेव रामचंद्र पाटील, सचिव श्री. आतिष बबन आचरे, खजिनदार सौ. शीतल सूर्यकांत कचरे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, शाखा समिती सदस्य, कर्मचारी वृंद व दैनंदिन ठेव प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरास संस्थेचे सभासद, ठेवीदार तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
समाजोपयोगी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा उद्देश यानिमित्ताने अधोरेखित झाला. यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top