ताज्या बातम्या

म्हातारे नव्हे तर आम्ही आहोत महातारे ; साठ वर्षावरील खेळाडूंनी दाखवून दिली धमक ; शिवभक्त राजू देसाई सपत्नीक सन्मानित

मुंबई : दहिसर येथील मल्ल्या वराडकर क्लबच्या वतीने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धा एम. सी. एफ जॉगर्स पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. एकूण चार संघांनी यात भाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार श्री जगदिश आचरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवचरित्र व्याख्यानकार व क्लबचे सदस्य श्री राजू देसाई आणि सौ. रेवा देसाई यांचा तसेच अमेरिकेचा प्रमुख द्रुतगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचे वडिल श्री नरेश नेत्रावळकर यांचा सत्कार करण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. अंतिम सामना राजा कदम संघाने जिंकला. भालेराव संघ उपविजेता ठरला . पारितोषिक वितरण श्री जगदिश आचरेकर व ज्येष्ठ खेळाडू जगदिश राणा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी क्लबचे श्री रवि मल्ल्या व शिरीष वराडकर यांनी पुढील काही महिन्यात अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असे जाहिर केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्लबचे श्री अविनाश तावडे, नामदेव दिघे, रमाकांत राणे, संजय दादरकर, राजू देसाई, सदाशिव मराठे, अरविंद पारेख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे रवि मल्ल्या यांनी सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top