महाबळेश्वर (नितीन गायकवाड) : जिल्हा परिषद व पंचायत समिती महाबळेश्वर सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गटातटाच्या राजकारणानंतर आता नामनिर्देशन अर्ज माघार घेण्यास सुरुवात झाली आहे.
आज नामनिर्देशन माघार घेण्याच्या दुसऱ्या दिवशी अर्ज माघारीबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यानुसार आज एकूण एक नामनिर्देशन अर्ज माघार घेण्यात आला आहे.
भिलार (७०) गणातून अपक्ष उमेदवार वैशाली बिपीन भिलारे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज माघार घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित गणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वर तालुक्यात निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, पुढील काळात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिकच गती येणार असल्याचे चित्र आहे.




