ताज्या बातम्या

कामोठे येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी भव्य सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम, शौर्यप्रात्यक्षिके व गुणवंतांचा सन्मान

पनवेल(अमोल पाटील) : कामोठे (ता. पनवेल) येथे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ उत्सव समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती भव्य, दिव्य व नेत्रदीपक वातावरणात साजरी करण्यात आली. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात जिजाऊ लाठी–काठी पथकाकडून लाठीकाठी व तलवारबाजीची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या पथकाचा सन्मान स्वराज्याचे शिलेदार येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थदादा कंक यांच्या हस्ते करण्यात आला.
चित्रकला व रांगोळी स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दीपा खरात यांनी “पोरी, जरा जपून” या विषयावर नाट्यप्रयोग सादर करून नव्या पिढीतील युवक-युवतींना महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला.
कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा जिजाऊंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. महिलांसाठी पैठणी कूपन काढून त्यांचा सन्मान करण्यात आला.
राजमाता जिजाऊ उत्सव समितीचे सर्वेसर्वा दशरथ पाटील यांच्या “चला स्वप्नांच्या दुनियेत जाऊया” या पुस्तकाचे अनावरण सिद्धार्थदादा कंक यांच्या हस्ते झाले. यावेळी वैभव घरात यांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक पोवाडा सादर केला; तो ऐकताना उपस्थित नागरिकांच्या अंगावर शहारे उभे राहिले. बांदल करण्याचे वंशज हरिश्चंद्र बांदल यांची उपस्थितीही कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
या सोहळ्यास कामोठेतील अनेक सामाजिक, राजकीय व व्यावसायिक मान्यवरांनी उपस्थिती लावली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे पनवेल तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top