ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा अभियानांतर्गत निढळ शाळेची तालुकास्तरीय समितीकडून तपासणी

सातारा : खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, निढळ येथे मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने सखोल तपासणी केली.
या वेळी पंचायत समिती खटावच्या वरिष्ठ विस्तार अधिकारी संगीता गायकवाड मॅडम, विस्तार अधिकारी शिवाजी कदम, केंद्रप्रमुख संजय दिडके साहेब तसेच वरिष्ठ मुख्याध्यापक (कातरखटाव) अनिल कदम उपस्थित होते.
मूल्यमापन समितीने शाळेची इमारत, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे तसेच परसबाग यांची पाहणी केली. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची चव घेऊन त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
शाळेतील स्वच्छता, नियोजनबद्ध उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमशीलता यांचे समितीकडून विशेष कौतुक करण्यात आले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top