ताज्या बातम्या

धारावीत 2017 चीच पुनरावृत्ती; महापालिका निवडणूक 2026 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा, शिवसेनेला फटका

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये धारावी परिसरात 2017 च्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. धारावीतील बहुतांश प्रभागांमध्ये काँग्रेस पक्षाने आपली पकड कायम राखत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

धारावी प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसचे उमेदवार सौ.आशा दीपक काळे, प्रभाग 184 मधून साजिदा बब्बू खान, प्रभाग 185 मधून टी.एम. जगदीश, प्रभाग 186 मधून सौ.अर्चना अविरत शिंदे, प्रभाग 187 मधून जोसेफ कोळी, प्रभाग 188 मधून भास्कर शेट्टी, तर प्रभाग 189 मधून सौ. हर्षला आशिष मोरे हे विजयी झाले आहेत. यामध्ये बहुसंख्य प्रभागांवर शिवसेनेने यश मिळवले आहे.
महत्त्वाचे म्हणजे 2017 च्या निवडणुकीतही प्रभाग क्रमांक 183 आणि 184 मध्ये काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. त्या वेळी प्रभाग 186 आणि 187 मध्ये शिवसेना, प्रभाग 188 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तर प्रभाग 189 मध्ये मनसेचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र 189 मधील मनसेचा विजयी उमेदवार नंतर शिवसेनेत दाखल झाला होता.
यंदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे वॉर्ड रचना बदलली. मागील निवडणुकीत प्रभाग 186 मधून शिवसेनेतर्फे विजयी झालेले विधानसभाप्रमुख वसंत नकाशे यांचा यावेळी वॉर्ड बदलला. तेथे मागासवर्गीय आरक्षण झाले.त्यामुळे त्यांनी महिला खुल्या वर्गासाठी झालेल्या आरक्षणामुळे प्रभाग 184 मधून सौ. वर्षा वसंत नकाशे या मैदानात उतरल्या होत्या. मात्र या प्रभागात मुस्लिम मतदारांचे प्रमाण जास्त असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला पुन्हा एकदा मतदारांनी पसंती दिली.
दरम्यान, प्रभाग 184 मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सौ. कोमल प्रवीण जैन यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन झाले. याचा थेट फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला बसला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
एकूणच धारावीतील निकाल पाहता, 2017 प्रमाणेच यावेळीही काँग्रेसने आपले पारंपरिक मतदारसंघ मजबूत ठेवत शिवसेना 4 तर महायुती 1 असे कल दिला असून धारावीच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top