ताज्या बातम्या

मुंबई महापालिका निकालानंतर महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच; महापौर शिवसेनेचा , शीतल म्हात्रेंची ‘अडीच वर्षांची’ गुगली

विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मुंबई महापालिकेच्या निकालाकडे पाहत थेट महापौरपदावर दावा सांगितला आहे. ठाकरे बंधूंमधील निकराची लढाई, तसेच काँग्रेस पक्षाने २० पेक्षा अधिक जागा जिंकत किंगमेकरची भूमिका घेतल्याने मुंबईचा निकाल त्रिशंकू अवस्थेत गेला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी महायुतीत खळबळ उडवणारी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचाच महापौर मुंबईत व्हायला हवा. आम्हाला अडीच वर्षांसाठी महापौरपद हवे आहे,” अशी थेट मागणी त्यांनी केली.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र होते. मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकली, तसतसे ठाकरे बंधूंचे आकडे वाढत गेले. काँग्रेस पक्षाने २२ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणत आपली ताकद दाखवली, तर एमआयएमने आठ जागा जिंकत निकालात मोठा ट्विस्ट दिला.
या साऱ्या घडामोडींनंतर स्वतः शिवसेना प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी “मुंबईचे महापौरपद शिवसेनेलाच हवे,” असे स्पष्ट संकेत दिले. मात्र “भाजपचा महापौर होईल,” असे थेट म्हणणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
ठाण्यातील निकालांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “ठाण्यात ७१ जागांवर विजय मिळवला असून ४ जागांवर आघाडी आहे. ठाणेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले.” मुंबईबाबत ते म्हणाले, “आम्ही बहुमताच्या जवळ आलो आहोत. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली. गेल्या साडेतीन वर्षांत आम्ही मुंबईत सुरू केलेल्या आणि गती दिलेल्या प्रकल्पांवर लोकांनी शिक्कामोर्तब केले.”
२५ वर्षे पालिकेत सत्ता असलेल्या विरोधकांविरोधात मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत शिंदे यांनी “मुंबईत सत्ता महायुतीचीच आहे, आणि लोकांनी विकासाला मतदान दिले,” असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आकडे वाढत असताना, काँग्रेस व एमआयएमच्या भूमिकेमुळे अंतिम सत्तासमीकरण नेमके कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मुंबई महापालिका निकालानंतर महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच; शिंदेंचा दावा, शीतल म्हात्रेंची ‘अडीच वर्षांची’ गुगली
मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मुंबई महापालिकेच्या निकालाकडे पाहत थेट महापौरपदावर दावा सांगितला आहे. ठाकरे बंधूंमधील निकराची लढाई, तसेच काँग्रेस पक्षाने २० पेक्षा अधिक जागा जिंकत किंगमेकरची भूमिका घेतल्याने मुंबईचा निकाल त्रिशंकू अवस्थेत गेला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी महायुतीत खळबळ उडवणारी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचाच महापौर मुंबईत व्हायला हवा. आम्हाला अडीच वर्षांसाठी महापौरपद हवे आहे,” अशी थेट मागणी त्यांनी केली.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र होते. मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकली, तसतसे ठाकरे बंधूंचे आकडे वाढत गेले. काँग्रेस पक्षाने २२ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणत आपली ताकद दाखवली, तर एमआयएमने आठ जागा जिंकत निकालात मोठा ट्विस्ट दिला.
या साऱ्या घडामोडींनंतर स्वतः शिवसेना प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी “मुंबईचे महापौरपद शिवसेनेलाच हवे,” असे स्पष्ट संकेत दिले. मात्र “भाजपचा महापौर होईल,” असे थेट म्हणणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
ठाण्यातील निकालांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “ठाण्यात ७१ जागांवर विजय मिळवला असून ४ जागांवर आघाडी आहे. ठाणेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले.” मुंबईबाबत ते म्हणाले, “आम्ही बहुमताच्या जवळ आलो आहोत. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली. गेल्या साडेतीन वर्षांत आम्ही मुंबईत सुरू केलेल्या आणि गती दिलेल्या प्रकल्पांवर लोकांनी शिक्कामोर्तब केले.”
२५ वर्षे पालिकेत सत्ता असलेल्या विरोधकांविरोधात मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत शिंदे यांनी “मुंबईत सत्ता महायुतीचीच आहे, आणि लोकांनी विकासाला मतदान दिले,” असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आकडे वाढत असताना, काँग्रेस व एमआयएमच्या भूमिकेमुळे अंतिम सत्तासमीकरण नेमके कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top