ताज्या बातम्या

शाहूपुरी येथील शहीद महाडिक पोलीस चौकीत समन्वयाचा अभाव नसावा …..

शाहूपुरी(अजित जगताप) ; सातारा शहर प्रवेशद्वार असलेल्या शाहूपुरी येथील शहीद कर्नल संतोष महाडिक पोलीस चौकीची नव्याने उभारणी होत आहे. हे स्वागतार्ह असले तरी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समन्वयाचा अभाव नसावा अशी अशी अपेक्षा शाहूपुरी येथील नागरिक करीत आहेत.
सातारा शहराला जोडणाऱ्या वाई – जावळी – महाबळेश्वर – खंडाळा तालुक्यात जाणाऱ्या प्रमुख रस्त्यामुळे शाहूपुरी येथील मोळाचा ओढा परिसर चांगलाच विस्तारलेला आहे. शहराच्या बाहेर असलेल्या या भागाचा सातारा नगरपालिका हद्दीत समावेश झाल्यापासून व पूर्वी ही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळले होते . आता त्याचा झपाट्याने विस्तार होणे धोकादायक आहे. परप्रांतीयांनाही सामावून घेणाऱ्या या परिसरात सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्ण अपयश आले आहे. अनाधिकृत मटका , चक्री,दारू, जुगार आणि लुटालुटीचे प्रकार घडत आहे . याला गुंडगिरी व स्थानिक काही लोकांचाही हात आहे. हे नाकारून चालणार नाही.
कर्नल शहीद संतोष महाडिक यांच्या नावाने मुख्य चौकात या ठिकाणी पोलीस चौकी होती. त्याचे आता नूतनीकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोलीस दलाने व सातारा नगरपालिकेने समन्वय साधून या भागाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या पोलिस चौकी नूतनीकरणाचे काम होत असल्याने पोलीस चौकीचे विलंबाने होणारे कामकाज थंडावले असले तरी ते पोलिस चौकी नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने या ठिकाणी पोलिस दलाची नेमणूक करणे. हे पोलीस खात्याचे कर्तव्य आहे. इतर वेळी कर्तव्यात कोणती ही कुचुराई न करता सढळ हस्ते कायद्याप्रमाणे घेणे देणे होत असते. हे सुद्धा लपून राहिले नाही.
ज्या शहीद संतोष महाडिक यांनी देश सेवेसाठी प्राण दिले. त्यांच्या नावाचा आदर राखणे. आता सर्वांचेच कर्तव्य आहे. याबाबत पोलिस महानिरीक्षक,सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे शाहूपुरी येथील लोकप्रतिनिधींनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शाहूपुरी परिसरातील
मोळाचा ओढा येथील वाढत्या नागरीकरण व सुख सुविधा बाबत प्राधान्य देताना कायद्याचे रक्षण करणारे काही सराईत भक्षण कर्ते किती टक्के वाढले आहे? याचे ही आत्मचिंतन केले पाहिजे अशी ही मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, या ठिकाणी अपघात घडू नये. यासाठी कायम स्वरुपी वाहतूक पोलिस जवान तैनात करावेत. अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. तसेच रस्त्यावरील पार्किंग बाबत दंडात्मक कारवाई केल्यास त्याचे ही स्वागत केले जाईल असे ही नमूद केले आहे.

—————————–

फोटो — मोळाचा ओढा परिसरातील शहीद कर्नल संतोष महाडिक पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे काम (छाया — अजित जगताप, शाहूपुरी )

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top